Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगला धडा'फेम चंचला हिला ओळखलं का? 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 18:27 IST

Virisha naik: 'तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेत अभिनेत्री विरीशा नाईक हीने चंचला ही भूमिका साकारली आहे.

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका अलिकडेच सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत या मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा होत आहे. शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत असून ही जोडी लोकप्रिय ठरत आहे. परंतुस यांच्यासोबत आणखी एक भूमिका गाजत आहे ती म्हणजे चंचला हिची.  ही अभिनेत्री नेमकी कोण? तिने यापूर्वी कुठे काम केलंय? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

'तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेत अभिनेत्री विरीशा नाईक हीने चंचला ही भूमिका साकारली आहे. अलिकडेच विरीशाने तिच्या भूमिकेविषयी आणि करिअरविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना तिने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केल्याचं म्हटलं आहे.

विरीशाची ही दुसरी मालिका असून यापूर्वी तिने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत विरीशाने यशच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका छोटेखानी असली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. विरीशाने सोशल मीडियावर तिचे श्रेयस तळपदेसोबतच्या काही सीनचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी