Join us

'ठिपक्यांची रांगोळी' फेम चेतन वडनेरे झाला भावुक; मानले मालिकेतील 'या' पात्राचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 17:38 IST

Chetan D Vadnere: 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका संपल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी'. टीआरपीच्या शर्यतीत कायम यशस्वी घोडदौड करणाऱ्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे लोकप्रिय मालिकांमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जात होतं. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह मालिकेतील कलाकारही प्रचंड भावुक झाले. सध्या सोशल मीडियावर मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका संपल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला.  त्यामुळे यातील काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यात चेतनने एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत शशांक या त्याने वठवलेल्या पात्राचे आभार मानले.

शशांक या पात्राने मला खूप काही दिलं, ही भूमिका कायम माझ्या लक्षात राहिल असं म्हणत शशांकने हा व्हिडीओ पोस्ट केला. सोबतच कॅप्शनमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या.

Thank you शशांक ! नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका त्याच्या वाट्याला येतात ज्या कायम लक्षात राहतात. "शशांक" हे पात्र माझ्या कायम स्मरणात राहीलच पण माझ्यासोबत अनेक कुटुंबात त्याने काही हक्काची माणसं जोडली होती त्या सर्व रसिक प्रेक्षकांनाही धन्यवाद."परि कोसळू द्यायचे ना स्वप्नांचे हे मनोरे ।विश्वासाने जपायचे घर आपले चंद्रमौळी ॥प्रीतीच्या रंगात सजवूठिपक्यांची रांगोळी...", असं चेतनने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शशांकप्रमाणेच सुप्रिया पाठारे, ज्ञानदा रामतिर्थकर या अभिनेत्रींनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.काही दिवसांपूर्वी ज्ञानदाने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिच्यासोबत सुमीदेखील होती. हा त्यांच्या सेटवरचा शेवटचा दिवस होता असं तिने यावेळी सांगितलं होतं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठी अभिनेता