Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच इंद्रा देणार प्रेमाची कबुली; काय असेल दिपूचं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:03 IST

Mann udu udu jhalay: सध्या इंद्रा दिपूच्या प्रेमात पडला असून तो लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. 

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं.  ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. विशेष म्हणजे दिपू आणि इंद्रा यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. इतकंच नाही तर आता या मालिकेत पुढच्या भागात काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं. सध्या इंद्रा दिपूच्या प्रेमात पडला असून तो लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. 

दिपूच्या प्रत्येक संकटात इंद्रा तिच्यामागे सावलीसारखा उभा असतो. याच कारण म्हणजे इंद्राचं दिपूवर असलेलं प्रेम. परंतु, कितीही प्रयत्न केला तरीदेखील इंद्राला त्याची प्रेमाची कबुली देणं काही शक्य होत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र, एका अपघाताच्या निमित्ताने तो त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दीपू एका स्टेजवर उभी असून तिच्या चहूबाजूला आग लागते.  विशेष म्हणजे या दिपूला वाचवण्यासाठी इंद्रा या आगीमध्ये उडी घेतो आणि तिला वाचवतो. 

दरम्यान, इंद्राने आगीत उडी मारल्यावर तू असं का केलंस असं दिपू विचारते. त्यावर माझं तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा काय जगलो असतो, असं म्हणत इंद्रा त्याच्या प्रेमाची कबुली देतो. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे