Join us

Video: मृत्यूवर मात करुन दिपू येणार शुद्धीवर; आनंदाच्या भरात इंद्र हॉस्पिटलमध्ये करणार जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:29 IST

Man udu udu zal: दिपूला शुद्ध येत असल्याचं पाहून आनंदाने वेडापिसा झालेला इंद्रा हॉस्पिटलमध्येच हा जल्लोष साजरा करणार आहे.

छोट्या पडद्यावर सुरु असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सानिकाची एका चूक दिपूच्या जीवावर बेतली. गेल्या काही दिवसांपासून दिपू मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, आता मृत्यूच्या दारातून दिपू परत येणार आहे. विशेष म्हणजे दिपूला शुद्ध येत असल्याचं पाहून आनंदाने वेडापिसा झालेला इंद्रा हॉस्पिटलमध्येच हा जल्लोष साजरा करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये दीपिका शुद्धीवर येताना दिसत आहे. इतकंच नाही तर दिपू बरी होत असल्यामुळे इंद्रा हॉस्पिटलमध्ये फुलं आणि फुग्यांची सजावट करत आहे.

दरम्यान, सानूच्या खोट्या प्रेग्नंसीचं सत्य समोर आल्यानंतर ती संपूर्ण देशपांडे कुटुंबाशी नातं तोडून सासरी निघून जाते. यावेळी दिपू तिला समजवण्यासाठी जाते. मात्र, रागाच्या भरात सानू तिला घरातून धक्के मारुन बाहेर काढते. यावेळी दिपू एका भरधाव डेम्पोच्या समोर येते. ज्यामुळे तिला गंभीर दुखापत होऊन ती कोमात जाते. मात्र, आता दिपू कोमातून बाहेर येणार आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुन्हा एकदा नवे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीऋता दूर्गुळे