Join us

Video: ७ वर्षांनंतर अप्पी-अर्जुन येणार एकमेकांच्या समोर; काय होईल या भेटीचं पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 11:08 IST

Appi Amchi Collector: पुन्हा एकदा अप्पी- अर्जुन एकत्र येणार का?

छोट्या पडद्यावर सध्या अप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुफान गाजत आहे. आतापर्यंत या मालिकेत अर्जुन आणि अप्पी यांच्या आयुष्यात आलेलं प्रत्येक वळण प्रेक्षकांनी एन्जॉय केलंय. नुकताच या मालिकेत ७ वर्षांचा लीप घेण्यात आला. विशेष म्हणजे अप्पी आणि अर्जुन यांच्या वेगळ्या झालेल्या वाटा आता ७ वर्षांनी पुन्हा जुळणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अप्पी आणि अर्जुन बऱ्याच वर्षानंतर एकमेकांच्या समोर येणार आहेत. ७ वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये गेलेल्या अप्पीची पुण्यात बदली झाली आहे. आणि, अर्जुनसुद्धा पुण्यामध्येच स्थायिक झाला आहे. त्यामुळे लवकरच या दोघांची भेट होणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अप्पी, अमोलला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर गेली असते. त्याचवेळी अप्पी आणि अर्जुनची भेट होते. मात्र, या पहिल्या भेटीतही त्यांच्यात वाद होतात. अर्जुन, अप्पीकडे अमोलला भेटण्याची मागणी करतो. मात्र, अप्पी त्यासाठी नकार देते. 

दरम्यान, अप्पी पुण्यातच असल्याचं अर्जुनला कळलं आहे. त्यामुळे तो अमोलचाही शोध घेणार असल्याचं दिसून येतं. परंतु, त्याला प्रत्येक वेळी भेटणारा सिम्बाच अमोल आहे. हाच आपला मुलगा आहे हे अर्जुनला कळणार का? पुन्हा एकदा अप्पी- अर्जुन एकत्र येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार