Join us

रुपालीचं चौकट कुटुंब एकाच फ्रेममध्ये; पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 13:01 IST

Rupali bhosale: रुपालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-वडील आणि भाऊ दिसून येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosale). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर रुपालीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना ही खलनायिकेची भूमिका साकारुन तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे नकारात्मक भूमिका साकारुनही तिने लोकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. रुपालीच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तिच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहेत. यामध्येच तिने एक छानसा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुपाली इन्स्टाग्रामवर कायम तिचे फोटोशूटचे फोटो वा व्हिडीओ शेअर करत असते. तर, कधी सेटवरचेही फोटो ती शेअर करत असते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच तिने तिच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिचं चौकट कुटुंब दिसून येत आहे.

दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सध्या शुटिंगमधून ब्रेक घेत कोकणदौऱ्यासाठी गेली आहे. या ठिकाणचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे आई-वडील आणि भाऊ दिसून येत आहेत. त्यामुळे रुपालीच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत.

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटीटेलिव्हिजन