Marathi Actress Minal Bal: स्वत: चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येजण यासाठी जीवतोड मेहनत करून स्वप्नपूर्ण करतो. २०२६ या वर्षात अनेक कलाकारांचं स्वप्न साकार झालं. कुणी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली तर कुणाची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली. आता या यादीत मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे. या अभिनेत्रीचं नाव मिनल बाळ आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'स्वराज्यरक्षक संभाजी','लग्नाची बेडी', जाऊ नको दूर... बाबा' या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनल बाळ हिने नुकतंच हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत मीनल बाळ यांनी लाडीचे पात्र साकारले होते. हे पात्र विशेष लक्षवेधी ठरल्याने मीनल यांना लोकप्रियता मिळाली होती. आजवर मराठी तसेच हिंदी मालिका सृष्टीत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या या नायिकेने हक्काच्या घरात पाऊल ठेवलं आहे.
नुकताच अभिनेत्री मिनल बाळने तिच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. याचे सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या कुटुंबियांसोबतचे आनंदाचे क्षण तसेच घरात गृहप्रवेश करतानाचे खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान, मिनल बाळने नवीन घर घेतल्याबद्दल कलाविश्वातील सेलिब्रिटी मंडळींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिजीत चव्हाण तसेच शरयू सोनावणे या कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Summary : Actress Minal Bal, known for 'Lagnachi Bedi,' celebrated her dream of owning a home. She shared joyous moments on social media. Celebrities congratulated her on this achievement.
Web Summary : 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्री मीनल बाल ने घर खरीदने का सपना पूरा किया। उन्होंने सोशल मीडिया पर खुशी के पल साझा किए। इस उपलब्धि पर हस्तियों ने उन्हें बधाई दी।