Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवराई माझी लाडाची गं! 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातारची लगीनघाई, 'असं' पार पडलं पहिलं केळवण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:05 IST

पंच पक्वान्नाचा बेत अन्…; गायत्री दातारच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

Gayatri Datar Kelvan: सध्या सगळीकडे लगीनघाईला सुरुवात झाली आहे.अनेक सेलिब्रिटीज अलिकडच्या काळात लग्नबंधनात अडकले.  अशातच मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. या ही अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. 'तुला पाहते रे' या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली या नायिकेच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकतंच गायत्रीचं केळवण पार पडलं.तिच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

प्रेक्षकांची लाडकी गायत्री आता वैयक्तिक आयुष्यात एक नवीन सुरुवात करत आहे. काही महिन्यांपूर्वीच  अभिनेत्रीने  “माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे” असं कॅप्शन देत सोशल मीडियावर प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती.त्यानंतर गायत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सुद्धा सर्व चाहत्यांना सर्वांना करून दिली होती. अशातच आता गायत्रीचं पहिलं केळवण पार पडलं आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीचं पहिलं केळवण हे तिच्या सिरिअर किलर नाटकाच्या टीमनं केल्याचं पाहायला मिळतंय. खास पंच पक्वानांचा बेत,फुलांची सजावट करून अभिनेत्रीचं केळवण करण्यात आलं. 

गायत्री दातारने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  तिचे पहिले केळवण साजरे करण्यात आल्याचं दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे." बेस्ट केळवण, बाय बेस्ट पिपल्स...; आयुष्यात खूप कमी वेळा अशी माणसे भेटतात जी कमी वेळात आपलंसं करुन टाकतात. सीरियल किलर चे आमचे निर्माते, दिग्दर्शक, भाऊ कदम, गौरी, तेजस आणि संपूर्ण टीम तशीच आहे. थॅंक्यू सो मच प्रणय सर, आणि तुमच्या कुटुंबाचेही खूप खूप आभार...", असं कॅप्शन देत  अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत. आता अभिनेत्रीचं केळवण पार पडल्यानंतर तिच्या लग्नासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चवरे ( Shrikant Chavare ). श्रीकांतने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्यानुसार IIT Bombay मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gayatri Datar's pre-wedding celebrations begin with 'Kelvan' ceremony!

Web Summary : Actress Gayatri Datar, known for 'Tula Pahate Re,' is set to marry. Her pre-wedding 'Kelvan' ceremony was recently held by her 'Serial Killer' drama team. Datar shared joyful moments on Instagram, expressing gratitude for her supportive team.
टॅग्स :गायत्री दातारटेलिव्हिजनसेलिब्रिटीलग्न