Sonali Patil Dance Video: मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एक नाव म्हणजे सोनाली पाटील. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घराघरात पोहोचली. दरम्यान, सोनालीच्या अभिनयासह तिच्या डान्सचा देखील एक चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो,व्हिडीओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सोनाली पाटीलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ऐश्वर्या रायच्या १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ताल चित्रपटातील 'कहीं आग लगे लग जावे' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओमधील सोनालीचे एक्सप्रेशन्स आणि आजुबाजूचा परिसर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री सोनाली पाटीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'वैजू नंबर वन', 'घाडगे अँड सून',' देवमाणूस' या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत काम करताना दिसते आहे.