Join us
Daily Top 2Weekly Top 5

Loves In The Air...; व्हॅलेंटाईनच्या दिवशी मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं प्रेम, कोण आहे 'तो' मिस्ट्री मॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:26 IST

मराठी अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Marathi Actress Sweta Kharat: अलिकडच्या काळात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनत चालला आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलेब्रिटी देखील या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न् करतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स ते याद्वारे शेअर करताना दिसतात. त्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. अशातच सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमुळे ही नायिका खऱ्या आयुष्यात प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

दरम्यान, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता खरात आहे. आज व्हेलेंटाईन डे चं  औचित्य साधून तिने सोशल मीडियावर जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली  दिली आहे. श्वेताने नुकतेच तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन श्वेताने लिहिलंय, "एका क्षणी, प्रेम खरं असतं असं वाटणं थांबलं. जणू ते सर्वांसाठी होतं... पण माझ्यासाठी नाही. आयुष्य कुठेतरी थांबल्यासारखं वाटतं होतं.मनात शंका होत्या. पण मला विश्वास आहे की देवाने माझ्या मनातील भावना ओळखल्या आणि मग त्याने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं."

यापुढे श्वेताने म्हटलंय,"हा माझ्यासाठी मानवी रूपातील एक आशीर्वाद. या प्रेमभावनांनी माझ्या आयु्ष्यातील जखमा भरून निघाल्या. आज, ही मुलगी खरोखर आनंदी आहे. शब्दांशिवाय समजून घेणारा माणूस सापडल्याबद्दल... आपल्या काही गोष्टी आपण लिहित नाही.तर त्या देवाने लिहिल्या असतात.  my love, व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. यापुढे प्रत्येक जन्मात, तूच माझा सोबती असशील. मी तुझ्यावर खूप प्रेम करते." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

मात्र, अभिनेत्रीच्या आयुष्यातील तो नेमका कोण आहे. याबद्दल तिने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. श्वेताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, श्वेता खरातच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'मन झालं बाजिंद,' राजा रानीची गं जोडी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress Sweta Kharat reveals love on Valentine's Day.

Web Summary : Marathi actress Sweta Kharat publicly professed her love on Valentine's Day via social media. She shared photos expressing gratitude for finding her partner, describing him as a blessing. The actress did not reveal the identity of her mystery man.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीव्हॅलेंटाईन्स डेसोशल मीडिया