Join us

'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचं दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:48 IST

'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; साकारणार ही भूमिका

Tujhi Majhi Jamali Jodi Serial : 'स्वामिनी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री रेवली लेले ही सध्या चर्चेत आली आहे. आपला दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर रेवतीने मालिकाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच एका नव्या मालिकेद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

अलिकडेच रेवती लेले स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेमध्ये तिने साकारलेलं मधुराणी हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आता नव्या भूमिकेतून ती मालिकाविश्वात कमबॅक करते आहे. रेवती सन मराठी वाहिनीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत एन्ट्री करणार आहे. या मालिकेत ती शमिका नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सन मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'तुझी माझी जमली जोडी' मालिकेचा आगामी प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्रीची खास झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. 

दरम्यान, 'तुझी माझी जमली जोडी' मालिकेचा प्रोमो पाहून त्यावर अभिनेता यशोमन आपटे तसेच अभिषेक रहाळकर यांसारख्या कलाकारांनी खास कमेंट्स करत रेवती लेलेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे आता अभिनेत्री या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरतेय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया