Join us
Daily Top 2Weekly Top 5

यश-कावेरीच्या आयुष्यात येणार वादळ! 'कोण होतीस तू...' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; 'ही' अभिनेत्री झळकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:40 IST

यश-कावेरीच्या आयुष्यात येणार नवं संकट! 'कोण होतीस तू...' मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री

Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial: 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका छोट्या पडद्यावरील मालिका अलिकडेच २८ एप्रिलपासून सुरु झाली. त्यानंतर अगदी अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, सुकन्या मोने तसंच साक्षी गांधी यांसारख्या कलाकारांची फळी मालिकेत पाहायला मिळते आहे. सध्या या मालिकेत यश त्याच्या मनातील भावना कावेरीसमोर व्यक्त करणार असल्याचा ट्र्रॅक सुरु आहे. अशातच या मालिकेत आता आणखी एका पात्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे चाहते देखील उत्सुक आहेत.

सध्या सोशल मीडियावर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेचा आगामी प्रोमो प्रंचड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळते आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून रेवती लेले आहे. दरम्यान, रेवतीने देखील तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर या मालिकेसंदर्भात स्टोरी शेअर केली आहे. लग्नाची बेडी या मालिकेतून रेवती लेले घराघरात पोहोचली. या मालिकेमध्ये तिने साकारलेलं मधुराणी हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आता नव्या भूमिकेतून ती मालिकाविश्वात कमबॅक करते आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत रेवती लेले अमृता नावाचं पात्र साकारणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिृत माहिती समोर आलेली नाही. 

वर्कफ्रंट

दरम्यान, अभिनेत्री रेवती लेलेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'स्वामिनी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. परंतु, लग्नाची बेडी मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अलिकडेच ती सन मराठीवरील 'तुझी माझी जमली जोडी' मालिकेत झळकली. आता नव्या मालिकेतून रेवती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी