Join us
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिलं अन् पहिल्याच भेटीत प्रेमात पडले, 'अशी' जुळली रेवती-कौशिकची लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:22 IST

'अशी' आहे रेवती लेले अन् कौशिक भिडेची लव्हस्टोरी! स्वत:च सांगितला किस्सा

Revati Lele Lovestory: अभिनेत्री रेवती लेले ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे. स्वामिनी, लग्नाची बेडी यांसारख्या मालिकांमधून काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. अलिकडेच २० फेब्रुवारीला रेवती आणि कौशिक भिडे लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री रेवती लेले आणि कौशिक भिडे यांचं पुण्यात मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. काही महिन्यांपूर्वीच रेवती लेलेने सोशल मीडियावर होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत तिच्या नात्याची कबुली दिली होती. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांची पहिली भेट तसेच प्रेमकहणीबद्दल सांगितलं.

अलिकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने रेवतीने पतीसह मुलाखत दिली.या मुलाखतीत आपल्या नवऱ्याची ओळख करून देत रेवती म्हणाली, "माझा नवरा कौशिक भिडे ब्रँड डिझायनर आहे. त्याची स्वत:ची कंपनी आहे आणि तो डिझायनिंग सुद्धा शिकवतो."  यापुढे अभिनेत्रीचा पती कौशिक म्हणाला, "मी हिला २०१९ मध्ये पाहिलं होतं. तेव्हा माझ्या घरी आई आणि आजी टीव्ही लावून बसले होते. हिला पाहून मी म्हणालो अगं मम्मी ही छान आहे गं... त्यानंतर तो विषय तिथेच संपला.  त्यानंतर पाच-सहा वर्षात मी हिला पाहिलं नाही. नंतर जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा मी तिला म्हटलं, तुला कुठेतरी पाहिलंय. मग स्वामिनीचा तिने संदर्भ दिला आणि मी लगेगच मालिकेचं पोस्टर पाहिलं. ही माझी तिच्या बाबतीत पहिली आठवण होती."

मग पुढे रेवती म्हणाली, "जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हाच मला जाणवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत भेटलो. मग, ५-७ दिवसांनी तो परत मुंबईत आला. मग पुन्हा आम्ही डिनरला एकत्र गेलो. सुरुवातीला आम्हाला वाटलं लाँग डिस्टन्स नातं आहे कसं होईल वगैरे…पण, गोष्टी छान जुळून आल्या आणि मग पुढे सहा ते सात महिन्यात आमचं लग्न ठरलं.या सगळ्या गोष्टींची कल्पना मी माझ्या घरच्यांना दिली होती. पहिल्या भेटीनंतर मी माझ्या आईला सगळं सांगि्तलं होतं. आमचं असं होतं, लग्नाचे फोटो शेअर करूया. पण मी म्हटलं अंगठीचा फोटो तरी शेअर करूया. तरीही कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी याला ओळखलं."

English
हिंदी सारांश
Web Title : Revati and Kaushik's love story: From TV screen to wedding bells!

Web Summary : Actress Revati Lele and Kaushik Bhide's marriage happened recently. Kaushik first saw Revati on TV six years ago. After meeting, they quickly fell in love. They married within seven months.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीलग्न