Join us

लाडक्या लेकाचं बारसं! 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नाव ठेवलंय खूपच खास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:43 IST

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीच्या लेकाचं थाटात पार पडलं बारसं, ठेवलं 'हे' नाव

Mangal Rane Post: छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे  तिन्ही भाग चांगलेच गाजले. शिवाय मालिकेला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला होता. रात्रीस खेळ चाले मालिकेने त्यातील प्रत्येक कलाकाराला लोकप्रियता मिळवून दिली. दरम्यान, या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात वच्छीची सून शोभा नावाचं पात्र अभिनेत्री मंगल राणेने साकारलं होतं. या पात्राने मंगल राणेला नवी ओळख मिळवून दिली. सध्या ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. अलिकडेच महिनाभरापूर्वी मंगलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. बाळ झाल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट लिहित चाहत्यांना दिली होती.त्यानंतर आता अभिनेत्रीच्या बाळाचं थाटात बारसं करण्यात आलं आहे.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर लेकाच्या नामकरण सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत. मंगलच्या लाडक्या लेकाच्या बारशाला तिचे कुटुंबीय,मित्र,मैत्रिणी तसेच नातेवाईक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्रीने सुंदर साडी परिधान करुन लेकालाही छानसे कपडे परिधान केले आहेत. मंगल राणेने तिच्या बाळाचं नाव निहार असं ठेवलं आहे. त्याचा अर्थ आशा आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक असा होतो. सध्या अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी तसेच तिचे चाहते कमेंट्स करुन शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात ३ ऑगस्ट रोजी मंगल राणेला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना माहिती दिली होती. मंगल राणेने २०२४ मध्ये संतोष पेडणेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.तिचे पती फोटोग्राफर लग्नाच्या वर्षभरातच या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Ratris Khel Chale' Fame Mangal Rane Welcomes Baby Boy, Names Him Nihar

Web Summary : Actress Mangal Rane, known for 'Ratris Khel Chale,' recently celebrated her baby boy's naming ceremony. She named him Nihar, which means hope and a new beginning. Rane and Santosh Pednekar welcomed their first child in August 2024. Congratulations are pouring in for the couple.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया