Join us

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:13 IST

'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 

Shruti Atre: लग्न असो किंवा आयुष्यातील एखादा सुंदर क्षण असो, हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडलळी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. गेल्या काही वर्षात मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी गुडन्यूज दिली आहे. अशाातच राजा राणीची गं जोडी या मालिकेतून घराघरात पोहोतलेली अभिनेत्री नुकतीच चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. काल मदर्स डे चं औचित्य साधून अभिनेत्रीने ती गरोदर असल्याचं  जाहीर केलं आहे. 

'बन मस्का' आणि 'बापमाणूस' या मालिकांमधून अभिनेत्री श्रुती अत्रे घराघरात पोहोचली. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकतंच अभिनेत्री श्रुती अत्रेने मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याला कॅप्शन देत अभिनेत्रीने ती लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, श्रुती अत्रेच्या या पोस्टवर नम्रता संभेराव, अभिनेता सौरभ चौघुले, मणिराज पवार तसेच अक्षया नाईक यांसारख्या कलाकारांनी अभिनेत्रीवर  शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, श्रुती अत्रेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून श्रुती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत राजश्री ढाले पाटील ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर अलिकडेच ती 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत पाहायला मिळाली. श्रुतीने काही वर्षांपूर्वी अश्विन दिवेकर यांच्यासोबत २०१९ मध्ये लग्न केलं आहे. त्याच्या सुखी संसाराला ६ वर्ष झाली असून आता हे जोडपं लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया