Join us

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:21 IST

जय शिव शंभो! लोकप्रिय अभिनेत्री शिवभक्तीत झाली तल्लीन; शेअर केले फोटो.

Sharmila Shinde: अभिनेत्री शर्मिला शिंदेने (Sharmila Shinde) प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आपल्या अभिनयासह ती बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्री झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मालिकेमध्ये  दुर्गा नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. शिवाय शर्मिलाने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.  अशातच नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री शर्मिला शिंदे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली आहे. जिथे ती शिवभक्तीत तल्लीन  झाल्याचं दिसून आलं.

नुकताच शर्मिला शिंदेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते. या मंदिरात महाकालेश्वर मंदिरात जाऊन अभिनेत्रीने दर्शन घेतंल आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. "जय शिव शंभो...",  असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

वर्कफ्रंट

अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. 'पुढचं पाऊल', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया