Madhurani Prabhulkar: मराठी मनोरंजनविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर हे नाव आग्रहानं घेतलं जातं. मराठी चित्रपटांबरोबरच नाटक आणि मालिकांच्या माध्यमातूनही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.मात्र, आई कुठे काय करते या मालिकेतून ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयाने आणि भूमिकांमुळे चर्चेत राहणारी मधुराणी आता या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.यादरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत तिने आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच मधुराणी प्रभुलकरने व्हायफळ ला मुलाखती दिली. या मुलाखतीत तिला आयुष्यातील कठीण काळाबद्दल विचारण्यात आलं.त्यावर बोलताना मधुराणी म्हणाली,"मी स्वत:ला खूप नशीबवान समजते की, माहेरी असताना आमच्या आयुष्यात आर्थिक संकटं तशी आली नाही.पण,एक फार मोठी घटना घडली,जेव्हा मी आणि माझ्या बहिणीला चार-पाच महिन्यांचं अंतरानं बाळ झालं.आमच्या दोघींच्याही हातात अगदी छोटी बाळं होती. आई आमची दोघींचीही बाळंतपणं करून तिच्या घरी गेली.कारण, तेव्हा बाळंतपणासाठी तिला आमच्याकडे यावं लागलं होतं."
यानंतर मधुराणी म्हणाली,"आई घरी परत गेली आणि काही दिवसांत बाबांना कॅन्सरचं निदान झालं. आणि त्या दोघांनी त्या गोष्टीला ज्या काही धैर्याने तोंड दिलं आणि आम्हाला त्याबद्दल कळू दिलं नाही. त्या दोघांनी ही एकमेकांमध्ये ठरवलं होतं की या दोघींना तान्ही बाळं आहेत. त्यामुळे ही गोष्ट यांना सांगायची नाही. जवळपास वर्ष- दीड वर्ष याबद्दल आम्हाला माहित नव्हतं. त्यातून ते बरे झाले. पण,तेव्हा ते दोघंच रिक्षाने हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेन्टसाठी जायचे.काय धैर्य आहे हे... आणि जेव्हा त्यांना कॅन्सर पु्न्हा डिटेक्ट झाला तेव्हा आम्हाला बोलवून त्यांनी याबद्दल सांगितलं. तेव्हा आमच्या मुली साधारण तीन वर्षाच्या होत्या. तेव्हा अर्थात आम्हाला त्याचं वाईट वाटलं. पण, ते धैर्य मला फारच कमालीचं वाटलं."
त्या दोघांनीच या सगळ्याचा सामना केला...
या मुलाखतीत बोलताना मधुराणीने सांगितलं, कठीण प्रसंगात कसं स्वत:ला सावरावं. या गोष्टी आपल्या लोकांकडे पाहून कळतात. "आपले आई-वडील किती पुढे जाऊन विचार करतात. मला यांचं लक्ष विचलित करायचं नाही. त्यांना त्यांच्या मुलांचं बाळपणीचा काळ अनुभव करुदे. किंवा त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष देऊदे. त्यांचं लक्ष जर माझ्या आजारपणाकडे गेलं तर त्या रडत बसतील,मग मुलांकडे लक्ष देणार नाहीत. किती त्रासातून ते गेले असतील. किती टेन्शन आलं असेल.त्या दोघांनीच या सगळ्याचा सामना केला. "
मग अभिनेत्रीने म्हटलं, "कधीकधी आपल्याला वाटतं की आपण नाही करू शकत. पण हे धैर्य आपण आजूबाजूच्या जेष्ठांना बघतच शिकतो. त्यांनी संकटांकडे कसं पाहिलं, कसं तोंड दिलं. आणि आपल्या ताकदीला कसं आव्हान केलं. शेवटी किती काहीही म्हटलं तरी आपल्या आजूबाजूला माणसं असली तरी काही लढे हे आपलेच असतात. त्याच्यासाठी आपल्याच मजबुत होणं, गरजेचं असतं.हे असे प्रसंग आपल्याला खूप काही शिकवतात." असं खुलासा मधुराणीने यावेळी केला.
Web Summary : Madhurani Prabhulkar shared the emotional story of her father's cancer diagnosis and her parents' resilience. They shielded their daughters initially, revealing the illness later. Her parents' courage inspired Madhurani to face life's challenges with strength.
Web Summary : मधुराणी प्रभुळकर ने अपने पिता के कैंसर के निदान और माता-पिता के लचीलेपन की भावनात्मक कहानी साझा की। उन्होंने शुरू में अपनी बेटियों को इससे बचाया, बाद में बीमारी का खुलासा किया। उनके माता-पिता के साहस ने मधुराणी को शक्ति के साथ जीवन की चुनौतियों का सामना करने के लिए प्रेरित किया।