Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीचं स्वप्न सत्यात उतरलं! खरेदी केली मर्सिडीज कार, भावना व्यक्त करत म्हणाली- "हा क्षण आमच्या आयुष्यात…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:47 IST

नाद करायचा नाय! मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली नवीकोरी मर्सिडीज, नवऱ्याचं मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत खास कनेक्शन

Marathi Actress New Car: हल्ली सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वसामान्यांसह अगदी सेलिब्रिटी मंडळी देखील यावर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स ते यामाध्यमातून चाहत्यांना देतात. अशातच मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नुकतीच अभिनेत्रीने नवीकोरी गाडी खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, या अभिनेत्रीचं नाव म्हणजे काजल काटे. 'डॉक्टर डॉन', 'स्वराज्य जननी जिजामाता', 'माझी तुझी रेशीमगाठ', तसेच 'मुरांबा' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री  काजल काटे घराघरात पोहोचली. माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील शेफाली पात्रामुळे आजही ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.नुकतंच काजलच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. काजलने पतीसह नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर याबद्दल तिने खास पोस्ट शेअर करत नव्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

काजल काटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करत म्हटलंय,"आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घेतली, काही गोष्टींचा त्याग केला, जोखीम पत्करली,  म्हणूनच हा क्षण आमच्या आयुष्यात आला. आम्ही एकत्र जे काही आमचं विश्व निर्माण केलंय,त्याचा आम्हाला अभिमान आहे. ओशन गाडी खूप खूप स्वागत... नव्या प्रवासाची सुरुवात करतोय...", अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.  अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी तिला नव्या गाडीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, आशय कुलकर्णी, आशुतोष गोखले तसेच विदिशा म्हसकर, प्रार्थना बेहेरे अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत काजलने शेअर केलेल्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काजलचा पती हा मुंबई इंडियन्सच्या टीमचा फिटनेस कोच आहे. मुंबईच्या संघातील क्रिकेटपटूंना तो फिटनेसचे धडे देतो. शिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत त्याचं खास कनेक्शन आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress's dream comes true: Buys Mercedes, husband's Mumbai Indians connection.

Web Summary : Marathi actress Kajal Kate fulfilled her dream by buying a Mercedes-Benz with her husband. She shared the news on social media, expressing gratitude for their journey. Her husband is a fitness coach for the Mumbai Indians cricket team.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया