Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या आहारात भाकरी अजिबात नसते, कारण...", गिरीजा प्रभूने सांगितलं फिटनेसचं रहस्य, रोज न चुकता करते 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:42 IST

गिरीजा प्रभूच्या फिटनेसचं रहस्य काय? अभिनेत्रीने सांगितला डाएट प्लॅन, म्हणाली... 

Girija Prabhu : बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री. यामध्ये असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयासह फिटनेसमुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू. मराठी मालिकाविश्वाती लोकप्रिय चेहरा म्हणून गिरीजा प्रभूकडे पाहिलं जातं. माालिकाविश्वात काम करताना कलाकारांच्या कामाच्या वेळा अनिश्चित असतात. कधी कधी सलाग १२-१२ तास कामही करावं लागतं. त्यामुळे अनेकदा आपला फिटनेस आणि त्वचेची काळजी घेणं ही तारेवरची कसरत असते. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गिरीजाने तिचा फिटनेस फंडा सांगितला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गिरीजाचा फिटनेस हा केवळ महागड्या जिम किंवा फॅन्सी डाएटवर अवलंबून नाहीतर तिच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग आहे. आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री लेटेस्ट मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच   ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजाचा तुझ्या फिटनेसचं रहस्य काय याबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"मला खायला खूप आवडतं. शूटच्या दरम्यान कधी-कधी वर्कआऊट करायला मिळतो तर कधी नाही. मागच्या वर्षी शेवटी-शेवटी मी इतकं खाल्लंय... मग व्हायचं जाऊद्या.पुढच्या महिन्यापासून आपण डाएट करू, असं करता करता वर्ष संपलं. पण, आता नवीन वर्षात आपण सुरुवात करूया."

मग ती म्हणाली,"मी शूटला असताना घरचा डब्बा घेऊन जायचे. असं नाही की बाहेरचंच खाते किंवा पालेभाज्या आवडत नाही. घरचंही मी तितक्याच आवडीने खाते... याशिवाय मला गोड पदार्थ खूप आवडतात. पण, आता ते मी कमी केलंय. शिवाय मी डाएट आणि वर्कआऊट सुरु केलं आहे. माझ्या डाएटमध्ये फक्त प्रोटीन्स आणि फायबर एवढंच आहे."

गिरीजाच्या आहारात असतात हे पदार्थ 

यानंतर ती म्हणाली, "माझ्या आहारात भाजी-भाकरी अजिबात नसते. शिवाय भाजी असेल तर फरस-बी वगैरे असते. सकाळी उकडलेली अंडी, बदाम आणि अव्हाकाडो किंवा भेंडीची भाजी असते. त्यानंतर दुपारी मासे, अंडी, मशरुम आणि सॅलेड असे प्रोटिनयुक्त पदार्थ असतात.मग परत संध्याकाळी भूक लागली तर उकडलेले अंडे तसेच चणे,ब्लॅक कॉफी... परत रात्रीही असे प्रोटीनयुक्त पदार्थ असतात. खरं सांगायचं तर मला आता गोड खाण्याचं क्रेव्हिंग होत नाही. पण,पुढेही मी चालू ठेवणार आहे. कारण, वर्कआऊट आणि डाएटने आपल्या शरीराला खूप फायदा मिळतो." असं अभिनेत्रीने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Girija Prabhu's fitness secrets: No bhakri, just protein and fiber!

Web Summary : Actress Girija Prabhu reveals her fitness mantra: a protein and fiber-rich diet, excluding bhakri. She emphasizes home-cooked meals and disciplined workouts for a healthy lifestyle, reducing sugar intake and embracing a protein-focused regimen for sustained well-being.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीफिटनेस टिप्स