Join us

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपताच प्रभूंच्या सूनेला लागली लॉटरी! झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:25 IST

मालिका संपताच अभिनेत्रीला लागली लॉटरी! 'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्रीची नव्या मालिकेत वर्णी; प्रोमो समोर

Television: काळाच्या ओघात मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये वाढ झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं एकच माध्यम आहे, ते म्हणजे टेलिव्हिजन. मात्र, हल्ली हे माध्यम देखील स्पर्धेचं माध्यम बनलं आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी शिवाय मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून नानविध प्रयोग केले जातात. नव्या मालिकांची घोषणा शिवाय मालिकांमध्ये नव्या पात्रांची एन्ट्री असे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अशातच सध्या नुकतीच झी मराठी वाहिनीच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. नुकताच सोशल मीडियावर या झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.त्यातून या अभिनेत्रीच्या भूमिकेबद्दल उलगडा झाला आहे.ही अभिनेत्री म्हणजे मानसी कुलकर्णी आहे. 

'सावळ्याची जणू सावली' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि साइंकित कामत यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यांनी साकारलेल्या सारंग-सावलीच्या पात्रांनी अनेकांच्या मनाचा ठाव घेतलाय. आता या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने सारंग-सावलीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील कमालीचे उत्सुक आहेत.

वर्कफ्रंट 

मानसी कुलकर्णीच्या कामाबद्दल अलिकडेच ती 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने गायत्री प्रभू नावाची भूमिका साकारली होती. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यानंतर मानसी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी