Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानदा-हर्षदचं केळवण! 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकारांनी केला खास बेत, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:47 IST

नवराई माझी लाडाची गं! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याची लगीनघाई,'असं' पार पडलं अभिनेत्रीचं पहिलं केळवण

Television Celebrity Wedding: गेल्या काही दिवसांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. आता लवकरच या यादीत मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर. ठिपक्यांची रांगोळी, लग्नानंतर होईलच प्रेम यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर वैयक्तिक आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकारांनी तिचं थाटामाटात पहिलं केळवण केलं.  

'लग्नानंतर होईलच प्रेम ' मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी ज्ञानदा रामतीर्थकरनं अलिकडेच फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा उरकला. ज्ञानदाच्या होणार्‍या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम आहे. तो एक सिनेमॅटोग्राफर आहे. नुकतंच ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सहकलाकारांनी ज्ञानदा-हर्षदचं केळवण साजरं केलं आहे. ज्ञानच्या पहिल्या केळवणासाठी त्यांनी खास बेत केल्याचं दिसतंय. अभिनेत्री नम्रता प्रधानने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर याचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.

ज्ञानदा आणि हर्षदची पहिली भेट २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली. त्यानंतर दोघांची मैत्री आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी प्रपोज केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Gyanada-Harshad's 'Kelvan' Celebrated by 'Thipkyanchi Rangoli' Co-stars Before Wedding

Web Summary : Actress Gyanada Ramtirthkar, known for 'Thipkyanchi Rangoli', is soon getting married. Her co-stars recently organized a 'Kelvan' ceremony for her and her fiancé, Harshad Atmaram. The couple met in 2015 during a short film shoot and got engaged in February.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंग