Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडेचं मालिकाविश्वात दमदार कमबॅक; 'या' नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:56 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं ३ वर्षांनी टेलिव्हिजनवर करणार कमबॅक; पात्राचं नावंही आलं समोर

Amruta Dhongade: सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची विशे पसंती मिळताना दिसतो. त्यामुळे अलिकडच्या काळात अनेक कलाकरांनी मालिकांकडे आपल्या मोर्चा वळवला आहे. अशातच 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडेचं  पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तब्बल तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अमृता धोंगडेचं पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन होत आहे. त्यानंतर अमृता आता नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 

दरम्यान,अमृता धोंगडेची कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती साकारत असलेल्या पात्राचं नाव कामिनी आहे. 'आई तुळजाभवानी आणि जगदंबावर मात करण्यासाठी महिषासुराने जागृत केला नवीन षड्रिपू - कामिनी.' अमृता या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यात आता या लाडक्या अभिनेत्री छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड खुश आहेत. 

दरम्यान, अमृता धोंगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेनंतर सोनी मराठी वाहिनीवरील 'तू चांदणे शिंपीत जाशी' या मालिकेत काम केलं. मात्र, लॉकडाऊनमुळे ही मालिका बंद झाली.त्यानंतर अभिनेत्रीने झी मराठी वाहिनीवरील 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकेमधूनही अमृता झळकली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी