Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अचानक न सांगता मालिकेतून रिप्लेस केलं अन्...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटू अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:44 IST

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चांगलीच गाजली. जवळपास ५ वर्ष या मालिकेने अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकत्याच

Television Actress Poonam Chandorkar: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच गाजली. जवळपास ५ वर्ष या मालिकेने अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. 'आई कुठे काय करते'या मालिकेत अरुंधतीची नणंदबाई म्हणजे विशाखा नावाचं पात्र अभिनेत्री पूनम चांदोरकरने साकारलं होतं.सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत पूनमने इंडस्ट्रीत काम करताना तिला आलेले अनुभव कथन केले आहेत. 

मालिकाविश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी पूनमने शिक्षिका होती. तसंच ती काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनमने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे. त्या दरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा मी दूरदर्शन करायला लागले तेव्हा श्वेता पेंडसे, मृणाल दुसानिस यांची एक मालिका होती. ती माझी पहिली मालिका म्हणता येईल. मी आता त्या मालिकेचं नाव घेत नाही पण, त्यामध्ये मला ऑफिसमधील मुलीचा रोल होता. तो रोल चांगला आहे, तुझ्या दुरदर्शनच्या तारखा सांभाळून घेऊ असं सांगण्यात आलेलं. पण, तिथे मला खूप वाईट अनुभव आला. मला तेव्हा इंडस्ट्री कशी आहे याबद्दल माहिती नव्हती."

मग पुढे मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "शिवाय सुरुवातीला माझ्यात संयम कमी होता. सकाळी बोलावलं असेल आणि संध्याकाळी सीन लागला तर तेव्हा चिडचिड व्हायची. पण, अशावेळी आपल्या सहकलाकारांकडून कळतं की, आपण एकदा दिवस दिला की दिला मग आपण शांत राहायचं. मला वाचनाची फार आवड होती. त्यामुळे मी पुस्तकं वाचत बसायचे. तिथे बऱ्याच गोष्टी मला खटकल्या. माझ्या दूरदर्शनच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हत्या. अचानक न सांगता मालिकेतून रिप्लेस करण्यात आलं. अशा काही गोष्टी पण घडल्या. त्यामुळे मला इंडस्ट्रीत अशीच वागणूक मिळते का? हा प्रश्न पडला.पण, पुढे जाहिरातीत काम करायला सुरवात केली तेव्हा माझा अनुभव खूपच चांगला होता. तिथे आदर दिला जातो, चांगले पैसे मिळतात." असा खुलासा पूनमने यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Aai Kuthe...' actress Poonam Chandorkar reveals being replaced without notice.

Web Summary : Poonam Chandorkar, known from 'Aai Kuthe Kay Karte,' shared her bitter experience of being abruptly replaced from a TV series early in her career. She highlighted the lack of respect and communication, contrasting it with her positive experiences in advertising.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी