Join us

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून यश प्रधानची एक्झिट; हर्षवर्धनच्या भूमिकेत दिसणार आता 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:30 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.

Premachi Goshta :  स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट'(Premachi Goshta) या  मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे तसेच अपूर्वा नेमळेकर यांसारखे तगडे कलाकार या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रेही प्रेक्षकांची आवडती झाली आहेत. परंतु, या मालिकेत सध्या एक वेगळा बदल पाहायला मिळतोय. 'प्रेमाची गोष्ट' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता यश प्रधानची मालिकेतून एक्झिट झाली आहे. यश प्रधानच्या जागी आता नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

सुरूवातीला हर्षवर्धन सावनीचा एक्स बॉयफ्रेंड तर आता मिहिकाच्या नवऱ्याच्या म्हणून  पाहायला मिळतोय. अगदी काही महिन्यापूर्वीच मिहिकाचं पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्केने देखील मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री अमृता बने मिहिकाचं पात्र साकारत आहे. 

दरम्यान, आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत यश प्रधानच्या जागी अभिनेता अनिरुद्ध हरिप दिसतो आहे. हर्षवर्धनची खलनायिका व्यक्तिरेखा तो साकारत आहे. अलिकडेच एका एपिसोडमध्ये हर्षवर्धन आणि मिहिकामध्ये वाद झाल्याचा एक सीन दाखवण्यात आला. त्यामध्ये अनिरुद्ध दिसून आला. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी