Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोटा 'सत्या' आला! 'साधी माणसं' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:44 IST

लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय अभिनेता झाला बाबा! घरी चिमुकल्याचं आगमन 

Akash Nalawade Share Good News: छोट्या पडद्यावरील साधी माणसं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अल्पवधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. शिवाय मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. दरम्यान, मालिकेतील सत्या आणि मिराची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांची दोघांची केमिस्ट्री अनेकांना भावली आहे. मालिकेत सत्याचं हे पात्र अभिनेता आकाश नलावडेने साकारलं आहे. सध्या आकाश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.  नुकतीच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे अभिनेता बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

 

आकाशने काही दिवसांपूर्वीच बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. अशातच अभिनेत्याने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी दत्तूने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सर्वांना दिली आहे.आकाश नलावडेला मुलगा झाला आहे. आकाशच्या काही मित्र-मंडळींनी त्याला सोशल मीडियावर टॅग त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्याने ही गुडन्यूज शेअर करताच नेटकऱ्यांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आकाशच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी असं आहे. त्यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हळला आहे.  आकाश नलावडे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत पश्या नावाचं पात्र साकारून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.सध्या हा अभिनेता स्टर प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. बाबा होणार असल्याने आकाश आनंदी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Saadhi Maanas' actor Akash Nalawade welcomes baby boy after two years!

Web Summary : Akash Nalawade, known for 'Saadhi Maanas', and wife Ruchika Dhuri welcomed their first child, a baby boy, two years after their marriage in 2023. The actor, also famed for 'Sahkutumb Sahparivar', is overjoyed.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया