Tv Actor : अभिनयच्या झगमगत्या दुनियेत नाव कमावण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेकजण या क्षेत्रात पाऊल ठेवतात. मात्र, त्यातील मोजक्याच जणांना यशाची चव चाखायला मिळते. दरम्यान, या अभिनय प्रवासात त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव येतात. शिवाय ग्रुपिझमचा देखील काहींना फटका बसतो. अशातच एका मुलाखतीत मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याने मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडमधील ग्रुपिझमच्या चर्चा कायम कानावर येतात. आता हे चित्र काहीसं मराठी इंडस्ट्रीत पाहायला मिळतंय. यावर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरेने आपलं मत व्यक्त केलं आहे. नुकतीच चेतन वडनेरेने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेता इंडस्ट्रीतील ग्रुपिझम आणि कास्टिंगपद्धतीवर भाष्य करत म्हणाला, "हो, आपल्याकडे ग्रुपिझम आहे. आता मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो र ते काय मला हकलणार नाही. पण, मला स्वत: हून त्या ग्रुपमध्ये जावं लागेल. एकतर आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की, निमिर्ती संस्था किंवा दिग्दर्शकच कास्टिंग करतो. शेवटी हे सगळं त्यानेच करावं पण कास्टिंग दिग्दर्शक किंवा कास्टिंग हब असं काही नाही, जसं हिंदीत असतं. "
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, त्या कास्टिंग हब किंवा दिग्दर्शकांकडे आपण ऑडिशन देतो. आपली माहिती त्यांना देतो, मग तो आपलं नाव इतर प्रोजेक्ट्साठी सुचवतो. आपल्याकडे तशी पद्धतच नाही. आपल्याकडे दिग्दर्शक येतो, त्यांच्या ओळखीतले चार-पाच जणांना घेऊन सिनेमा करतो. तो सिनेमा कधी येतो,कधी जातो कळतचं नाही. पण, मला भविष्यात ज्या दिग्दर्शकांकडे मला काम करायचं आहे त्यांच्याकडे मी संपर्क करेन. अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.
वर्कफ्रंट
चेतन वडनेरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आराधना, लेक माझी लाडकी, फुलपाखरू ठिपक्यांची रांगोळी या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'लपंडाव' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.