Join us

'दामिनी २.०' येतेय! 'हा' लोकप्रिय अभिनेता साकारणार डॅशिंग भूमिका; प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:36 IST

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याची 'दामिनी २.०' मध्ये वर्णी! साकारणार पोलिसाची भूमिका, कोण आहे तो?

Damini 2.0 Serial: मराठी मालिकाविश्वातील गाजलेल्या लोकप्रिय मालिकांपैकी एक नाव म्हणजे दामिनी. ९० च्या दशकात दुरचित्रवाहिन्यांच्या काळात या मालिकेने इतिहास रचला होता. या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारांचा अभिनय, टायटल सॉंगला देखील प्रेक्षकांची दाद मिळाली होती. एकेकाळची ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'दामिनी २.०' मध्ये नव्या कथेसह नवे चेहरे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

दामिनी मालिकेत एका निर्भीड पत्रकार दामिनीची कथा दाखवण्यात आली होती. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता प्रतीक्षा यांच्या जागी दामिनी २.० मध्ये अभिनेत्री सु्प्रिती शिवलकर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अलिकडेच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला.या प्रोमोमध्ये मालिकेतील  कलाकारांबद्दल देखील उलगडा करण्यात आला आहे. अभिनेत्री क्षिती जोगसह मालिकेत सुबोध भावे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे या मालिकेत आता नवीन काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. येत्या१३ ऑक्टोबर पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता ही मालिका सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. 

हा अभिनेता दिसणार डॅशिंग भूमिकेत...

मिडिया रिपोर्टनुसार, दामिनी २.० मालिकेत अभिनेता धु्व्र दातार देखील दिसणार असल्याची शक्यता आहे. ध्रुव दातार मालिकेमध्ये पहिल्यांदा डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ध्रुव दातारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो स्टार प्रवाहच्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत दिसला होता. मात्र, काही कारणास्तव त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली.  

English
हिंदी सारांश
Web Title : 'Damini 2.0' is coming! This popular actor will play dashing role.

Web Summary : The popular Marathi series 'Damini' is back with 'Damini 2.0', featuring Supriti Shivalkar. Subodh Bhave and Kshiti Jog also star. Dhruv Datar will be seen as a dashing police officer. Premieres October 13th on Sahyadri channel.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसुबोध भावे सोशल मीडिया