Join us

'ठिपक्यांची रांगोळी'नंतर अभिनेत्याने तब्बल १० ऑफर्स नाकारल्या! कारण सांगताना चेतन वडनेरे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:37 IST

"ठिपक्यांची रांगोळीनंतर १० ऑफर्स नाकारल्या, कारण..." चेतन वडेनेरेने सांगितली मन की बात, म्हणाला- सारखं तेच..."

Chetan Vadnere: अभिनेता चेतन वडनेरे या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ' ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून तो प्रसिद्धाझोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेला शशांक कानिटकर मालिका रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, या मालिकेनंतर चेतन वडनेरे नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लपंडाव या नव्याकोऱ्या मालिकेत कान्हा नावाची भूमिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे.

नुकतीच चेतन वडनेरेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या फिल्मी करिअरविषयी मनमोकळेपणाने सांगितलं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी'नंतर आता प्रेक्षक तुला 'लपंडाव'मध्ये पाहत आहेत. हा संयम तू कसा ठेवतोस. त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला," माझ्यामध्ये संयम आहे. मला काम मिळवण्याची किंवा दिसण्याची घाई नाही. शिवाय मला असं वाटत की नाही की मी दोन-तीन वर्ष दिसलो नाहीतर मी संपेन. मी दोन-तीन वर्षानंतर काय करतोय त्यावर संपेन मी की टिकणार आहे हे ठरतं. त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही. मी इन्स्टाग्रावर सुद्धा सहा-सात महिन्यानंतर माझा एखादा फोटो पोस्ट करतो. तसंच मी रिल्स करत नाही. त्याची मला काही इनसिक्योरिटी नाही आहे."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "आता लपंडाव आणि ठिपक्यांची रांगोळीमध्ये मी जवळपास १० मालिका सोडल्या. कारण, त्यातील बऱ्याच मालिकांमध्ये शशांकसारखेच रोल होते. फक्त त्याच्यात चष्मा नाहीये किंवा त्यात लहान मुलगी आहे. शिवाय त्या चांगल्या चांगल्या चॅनेलवरच्या मालिका होत्या. पण म्हटलं हेच जर आता केलं तर लोकांना वाटलं असतं की हा सारखं तेच करतोय. प्रेक्षकांना तसं वाटू नये म्हणून मी वेगळ्या भूमिकेसाठी थांबलो होतो. असा खुलासा चेतनने या मुलाखतीमध्ये केला.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी