Join us

'या' चिमुकलीला ओळखलं का? 'येऊ कशी तशी...'मध्ये साकारतीये 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:03 IST

Anvita phaltankar : सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. यात खासकरुन त्यांच्या कॉलेज जीवनातील, शाळेतील किंवा बालपणीचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होतात.

ठळक मुद्देफोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण आहे

सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. यात खासकरुन त्यांच्या कॉलेज जीवनातील, शाळेतील किंवा बालपणीचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होतात. विशेष म्हणजे अनेकदा या सेलिब्रिटींचे जुने फोटो पाहिल्यावर त्यांना ओळखणंही कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

अलिकडेच छोट्या पडद्यावर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे मालिकेतील अनेक कलाकार आज लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. त्यातच स्वीटू आणि ओम ही जोडी तर अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. इतकंच नाही तर नलू, शकू, मालविका, सुमन या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीदेखील घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातच या अभिनेत्रींपैकी एकीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो स्वीटूचा म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरचा आहे. अन्विता अनेकदा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. बरेचदा ती तिचे काही फोटो, डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या हातावरील सुंदर मेंदी दाखवत आहे.

दरम्यान, 'टाइमपास' चित्रपटात झळकलेली अन्विता 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या तिची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार