Join us

गुरुजींचं भाकीत खर ठरणार?; राया-कृष्णाच्या गाडीला गंभीर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:14 IST

Mann zhal bajind: गुरुजींच्या भाकिताप्रमाणे रायाची पहिली बायको अल्पायुषी ठरणार आहे. नुकतंच मालिकेत राया-कृष्णाचा दिवाळीतला पहिला पाडवा साजरा होतो.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'(mann. या मालिकेत आता कुठे हळूहळू राया आणि कृष्णा यांच्यातील प्रेम फुलू लागलं आहे. परंतु, कृष्णावर येणारी संकट मात्र जराही कमी झालेली नाहीत. लग्नाच्याच दिवशी कृष्णावर मोठं संकट कोसळलं होतं. या अपघातातून कृष्णा थोडक्यात बचावली. त्यातच पुन्हा एकदा तिच्या साडीला आग लागल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा तिच्यावर नवीन संकट कोसळणार असून गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरताना दिसणार आहे.

गुरुजींच्या भाकिताप्रमाणे रायाची पहिली बायको अल्पायुषी ठरणार आहे. नुकतंच मालिकेत राया-कृष्णाचा दिवाळीतला पहिला पाडवा साजरा होतो. पहिला दिवाळसण म्हणून राया आणि कृष्णा घरच्यांबरोबर कुलदेवीच्या दर्शनाला जातात. परंतु, परत येत असताना वाटेत राया-कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. कृष्णा गाडीतून बाहेर फेकली जाते आणि रायाला कृष्णा दिसेनाशी होते. त्यामुळे आता कृष्णा पुन्हा एकदा मृत्यूच्या दारात उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

'मन झालं बाजिंद'मधील सोज्वळ कृष्णाचा BOLDअंदाज; खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त

दरम्यान, कृष्णाच्या जीवाला असलेला धोका टळेल कि गुरुजींचं भाकीत खरं ठरेल? हे लवकरच प्रेक्षकांना पुढील भागात समजणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार