Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या सौंदर्यावर चाहतेही फिदा; हृताची नवी भूमिका ठरतीये लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:54 IST

Mann udu udu zhala : या मालिकेत हृता आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत साकारत असून अगदी पहिल्या भागापासून ही मालिका लोकप्रिय ठरत आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली

हृता दुर्गुळे हे नाव आता कोणत्याच प्रेक्षकासाठी नवीन राहिलेलं नाही. 'फुलपाखरु' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली हृता आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. अलिकडेच हृताची मुख्य भूमिका असलेली 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या मालिकेत हृता साकारत असलेल्या दीपिका या भूमिकेमुळे पुन्हा एकदा तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत हृता आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत साकारत असून अगदी पहिल्या भागापासून ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. इतकंच नाही तर हृता आणि अजिंक्यची जोडी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. 

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या हृताने मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हृताच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. केवळ चाहतेच नव्हे तर काही लोकप्रिय कलाकारांनीही हृताला दाद दिली आहे. त्यामुळे हृता व अजिंक्ये आपल्या चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

या मालिकेत हृताने दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय. दीपिका ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय. पण याच दरम्यान तिच्या आयुष्यात इंद्राची एण्ट्री होताना दिसते. त्यामुळे आता या पुढे मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीटिव्ही कलाकार