Join us

अखेर अप्पी झाली कलेक्टर; मोठ्या जल्लोषात होणार कलेक्टर मॅडमचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 19:28 IST

Appi aamchi collector: झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अप्पी कलेक्टर झाल्याचं दिसून येत आहे.

अगदी पहिल्या भागापासून लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. बऱ्याच वर्षांपासून मेहनत घेत असलेली अप्पी अखेर कलेक्टर होणार आहे.  सध्या या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत असून बापूंनी अप्पीच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अप्पी कलेक्टर झाल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर, अप्पीच्या स्वागतासाठी बापूंनी मोठी तयारी केली असून राणीलादेखील छानसं सजवलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बापू राणीला सांगतात की,"राणी ऐकलंस का... आपली अप्पी कलेक्टर झाली. खरंतर ती माझी दुसरी लेक पण पहिली लेक तू आहेस.. लक्षात ठेव. अप्पीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना माझ्याबरोबर हाताला हात देत तू उभी राहिली. त्यामुळे शक्य झालं. अप्पीने तुझ्यात बसून अभ्यास केला आहे. अप्पीला अभ्यास करताना तू पाहिलं आहेस. तिचं यश पाहिलं आहेस. माझ्या लेकीने खूप मेहनत घेतली, अभ्यास केला. आज ती कलेक्टर झाली आहे फक्त तुझ्यामुळे. आज अप्पीसाठीच नाही आपल्यासाठीपण अभिमानाची गोष्ट आहे...आज पेढे वाटत सर्वांना सांगायचं अप्पी आमची कलेक्टर".

दरम्यान, आसगावामध्येही अप्पीच्या कलेक्टर होण्याचा मोठा जल्लोष केला जातो.  गावातील प्रत्येक दारापुढे सडारांगोळी घातली जाते. दारोदारी तोरणं बांधली जातात. इतकंच नाही त फटाके,पेढे यांनी अप्पीचं स्वागत केलं जातं. सध्या प्रोमोमध्ये जरी हे थोडक्यात दाखवण्यात आलं असलं तरीदेखील १६ एप्रिल रोजी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये अप्पीच्या कलेक्टर होण्याचा जल्लोष सविस्तर पाहता येणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी