Join us

संजना अन् अरुंधतीचा पारंपरिक साज; नऊवारी साडीत वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:17 IST

Aai kuthe kay karte : संपूर्ण देशमुख कुटुंब बाप्पाच्या तयारीला लागलं असून संजना आणि अरुंधती यांचा मराठमोठा साजशृंगार प्रत्येकालाच पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देदेशमुखांच्या घरात संजनाचा पहिलाच गणेशोत्सव

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु झाली आहे. विविध रंगांनी, फुलांनी बाजारपेठा सजून गेल्या आहेत. तर, प्रत्येक घरात या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं, मांगल्याचं आणि प्रसन्नतेचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजेच गणेशोत्सवाचा हाच उत्साह मालिकांमध्येही पाहायला मिळतोय. 

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत देशमुखांच्या घरातही बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब बाप्पाच्या तयारीला लागलं असून संजना आणि अरुंधती यांचा मराठमोठा साजशृंगार प्रत्येकालाच पाहायला मिळणार आहे. देशमुखांच्या घरात संजनाचा पहिलाच गणेशोत्सव असल्यामुळे मोठ्या थाटामाटात ती पारंपरिक नऊवारी साडीत दिसून येणार आहे. तर, अरुंधती सुद्धा पहिल्यांदाच थोड्याशा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

'त्यांना पॉर्न इंडस्ट्रीबद्दल सांगितलं होतं'; सनीच्या निर्णयावर कुटुंबीयांनी दिलेली 'ही' प्रतिक्रिया

दरम्यान, 'सध्या आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. संजना आणि अनिरुद्धचं लग्न झालं आहे. मात्र, अजूनही अरुंधती देशमुखांच्या कुटुंबात राहत असल्यामुळे संजना आणि कुटुंबीयांमध्ये दररोज नवे खटके उडत आहेत. त्यातच आता संजनाचा मुलगादेखील काही दिवस तिच्यासोबत राहायला आला आहे. त्यामुळे आता या मालिकेत आणखी कोणती रंजक वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी