Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:16 IST

"लंडनच्या बसमध्ये...", संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कुशल ब्रदिकेने केलेली पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांचा आज वाढदिवस आहे. 'दुनियादारी', 'फक्त लढ म्हणा', 'चेकमेट', 'प्यारवाली लव्ह स्टोरी', 'साडे माडे तीन' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांचा चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेने संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संजय जाधव यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्टही लिहिली आहे. कुशलने त्याच्या पोस्टमध्ये "तशी आपली ओळख फार जुनी म्हणजे “साडे माडे तीन” पासूनची पण मैत्री कधीपासूनची? हे काही मला नीटसं सांगता येणार नाही. “गंगुबाई नॉन मॅट्रिक” फिल्मच्या सेटवर फ्रेम रिकामी दिसते ! म्हणून मला वापरलंस तिथली...का मग “रावरंभाच्या” हॉटेल मधली पहाटेच्या 5:30 ची ब्लॅककॉफी वाली मैत्री आपली...का मग “हवा येऊ द्या” च्या सेटवर मी संजू दादा बनून येतो आणि तुझ्यासारखा “सारे विश्वची माझे घर” असल्यासारखा वावरतो तेव्हाची...का मग आत्ता आत्ता लंडनच्या बसमध्ये तुझ्या Spartas सोबत झालेल्या प्रवासातली मैत्री," असं म्हटलं आहे.

"NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती, हे सगळं बॉसच्या...", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

पुढे त्याने "दादा तुला ना माणसांना आपलंसं करून घ्यायचं व्यसन आहे. एवढी “दुनियादारी” बघितलेला माणूस तू ,आयुष्याने “चेकमेट” केलं तरी “फक्त लढ म्हणणारा” असा “गुरु” तूच. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुझी एक “प्यार वाली लव स्टोरी” आहे आणि प्रत्येकाच्या यशात तुझा “खारी बिस्किटाचा” तरी वाटा आहेच. आज तुझ्या वाढदिवशी तुझ्या “कलावतीला” लोकांच्या मनापर्यंत जायला “डोंबिवली फास्ट” ट्रेन मिळू दे, आणि box office वर “धुडघूस”घालूदेत हाच देवाकडे “जोगवा” मागतो. Happy birthday दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुला मनापासून प्रेम. तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं हेच खरं...", असं म्हणत संजय जाधव यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कुशल बद्रिकेने संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. सध्या तो 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताकुशल बद्रिकेसंजय जाधवमराठी चित्रपट