मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणजेच अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. दोघंही सोशल मीडियावर कमालीचे लोकप्रिय आहेत. नारकर दाम्पत्याला एक मुलगा आहे ज्याचं नाव अमेय नारकर (Ameya Narkar). अमेय बरेच महिने परदेशात होता. तर आता तो नुकताच भारतात परत आला आहे. विमानतळावर अमेयला गर्लफ्रेंडने सरप्राईज देत त्याचं स्वागत केलं होतं. अमेय परत आल्याने दोघंही आता छान वेळ घालवत आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
अमेयच्या गर्लफ्रेंडचं नाव ईशा संजय (Isha Sanjay) आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. यात ती ब्लॅक जम्पसूटमध्ये गोड दिसत आहे. तसंच तिने अमेयसोबतचाही फोटो शेअर केला आहे. दोघांनी बांद्रा येथील एका सुंदर कॅफेला भेट दिली. याच कॅफेबाहेरचा त्यांचा हा फोटो आहे. दोघांनी अख्खा दिवस बांद्रामध्ये फेरफटका मारला. 'इट वॉज अ बांद्रा डे' असं कॅप्शन ईशाने लिहिलं आहे. तसंच पोस्टमध्ये तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यात अमेयने तिची क्युट रिअॅक्शन कॅप्चर केली आहे.
ईशाच्या या पोस्टवर अमेयने 'मनीमाऊ' अशी कमेंट केली आहे. दोघांची जोडी अगदीच गोड दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ईशाने होणाऱ्या सासू म्हणजे ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही क्युट व्हिडिओ शेअर केला होता. ईशाच्या प्रत्येक पोस्टवर ऐश्वर्या नारकरांची कमेंट असते.
ईशा आणि अमेय इतके दिवस लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. आता अमेय भारतात आला असून तोही इंडस्ट्रीत काम करणार आहे. याआधी त्याने'खरा इन्स्पेक्टर मागावर' या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर ईशा सध्या 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिसत आहे.