Join us

"सुखाचा संसार हा आपल्या नशिबात...", अभिनेता कुशल बद्रिकेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:29 IST

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल बद्रिके घराघरात पोहोचला.

Kushal Badrike: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. दरम्यान, अभिनेता त्याच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्याबाबत कुशल पोस्ट शेअर करत असतो. तो अनेकदा मजेशीर पोस्ट लिहित असतो. अशीच एक मजेशीर पोस्ट नुकतीच त्याने बायको संदर्भात लिहिली. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कुशल बद्रिकेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर बायको आणि मुलासोबतचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओला कॅप्शन देत त्याने म्हटलंय, "माणसाला आयुष्यात सुखाचा क्षण वेचता आला नाही तरी चालेल पण बायकोने सांगितल्यावर तिचा छानसा फोटो मात्र खेचता आला पाहिजे, सुखाचा संसार हा आपल्या नशिबात असला तरी क्लिक होईलच असं नाही, ते बऱ्याचदा कॅमेरामधे केलेल्या क्लिकवरसुद्धा डिपेंड करतं. मला छान फोटो काढायला जमतील हा शोध माझ्या बायकोने लावलाय."

 पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "यावरून असे सिद्ध होते की बऱ्याचदा “भीती” सुद्धा शोधाची जननी असू शकते.आणि ह्या निकषावर माझ्या मुलाचा संसार सुद्धा छान होईल असा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय...!" कुशलने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आणि आणि त्याच्या चाहत्यांनी सुद्धा कमेंट केल्यात.  अभिनेत्री सुकन्या मोने, नम्रता संभेराव यांनी यांनी खास कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

वर्कफ्रंट

कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोने कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'जत्रा', 'पांडू', 'डावपेच', 'भिरकीट', 'रंपाट', 'बापमाणूस', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'माझा नवरा तुझी बायको' यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया