Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेवाच्या येण्यामुळे सिद्-आदितीच्या नात्यावर परिणाम; 'बिग बॉस' फेम वीणा जगतापची 'तुझ्या माझ्या संसाराला...'मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:41 IST

Veena jagtap: 'बिग बॉस मराठी', 'आई माझी काळुबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली वीणा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत  एन्ट्री करणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मात्र, आतापर्यंत या मालिकेत अनेक नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. तर, काही लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेला रामराम केला. यामध्येच आता बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगतापची या मालिकेत एन्ट्री होणार आहे.

'बिग बॉस मराठी', 'आई माझी काळुबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली वीणा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत  एन्ट्री करणार आहे. या मालिकेत वीणा एका बिझनेसवूमनची भूमिका साकारणार आहे. सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वीणाची या मालिकेत दमदार एन्ट्री होताना दिसत आहे.

दरम्यान, वीणा या मालिकेत रेवा दिक्षित ही भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच वीणा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, या मालिकेत रेवाच्या एन्ट्रीमुळे आदिती आणि सिद्धार्थ यांच्या नात्यात कोणता बदल होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :वीणा जगतापटेलिव्हिजनटिव्ही कलाकार