Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदी रंगली गं...! 'तुझ्या सोबतीने' मालिकेतील नुपूर खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार, नवराही आहे लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:56 IST

'तुझ्या सोबतीने' फेम अभिनेत्रीचा पार पडला मेहंदी सोहळा; होणारा नवरा 'या' मालिकेत करतोय काम 

Aetashaa Sansgiri Mehendi Ceremony: यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.तर येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. रेवती लेले, गायत्री दातार या सगळ्याच कलाकारांच्या घरी आता लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या आणखी एका अभिनेत्रीचा नुकताच मेहंदी सोहळा पार पडला आहे. या अभिनेत्रीचं नाव एतशा संझगिरी आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

 

'छोटी मालकीण', 'राजा राणीची गं जोडी',' दख्खनचा राजा जोतिबा', 'निवेदिता माझी ताई' तसेच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली नायिका एतशा सांझगिरी लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. काल एतशाच्या मेंदीचा सोहळा पार पडला असून आज सकाळीच त्यांची हळद पार पडणार आहे. 

अभिनेत्री एतशा संझगिरी  वैयक्तिक आयुष्यात अभिनेता निषाद भोईरसोबत लवकरच लगबंधनात अडकणार आहेत.  निषाद आणि एतशा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहे.सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी मंडळी तसेच त्यांचे चाहते देखील या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात निषाद आणि एतशा यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ते लग्नगाठ बांधत आहेत. निषाद हा सावळ्याची जणू सावली तसेच एतशा ही सध्या 'तूझ्या सोबतीने' मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत ती नुपूर नावाची भूमिका साकारते आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aetashaa Sansgiri of 'Tujhya Sobatine' to marry actor Nishad Bhoir.

Web Summary : Actress Aetashaa Sansgiri, known for roles in several Marathi series, is set to marry actor Nishad Bhoir. The couple, who recently had their mehendi ceremony, have been dating for years and got engaged in October. Currently, Aetashaa stars in 'Tujhya Sobatine'.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल फोटोज्