Join us

तितीक्षा तावडेची लगीनघाई! 'दृश्यम २' फेम अभिनेत्याबरोबर अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 08:41 IST

यांचं पण ठरलं! सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे बांधणार लग्नगाठ

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. स्वानंदी टिकेकर, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, मुग्धा-प्रथमेश यांच्या मागोमाग काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सुर्वेही लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरू आहे. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री तितीक्षा तावडेने प्रेमाची कबुली दिली आहे. तितीक्षा आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 

तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सिद्धार्थबरोबरचा केळवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "त्याने मला डेटसाठी विचारलं आणि ते केळवणात रुपांतरित झालं", असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तितीक्षा आणि सिद्धार्थ अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. 

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत सिद्धार्थ आणि तितीक्षाने एकत्र काम केलं होतं. तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिद्धार्थही अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. त्याने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याबरोबरच अजय देवगणच्या 'दृश्यम २' सिनेमातही तो झळकला होता. 

टॅग्स :तितिक्षा तावडेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार