Join us
Daily Top 2Weekly Top 5

तन्वी मुंडलेच्या आईला पाहिलंय का? लेक अभिनेत्री असूनही राहतात अत्यंत साधेपणाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:30 IST

Tanvi Mundle: तन्वीची आई अत्यंत साधेपणाने राहत असून त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले (tanvi mundle) मुख्य भूमिका साकारत आहे. उत्तम अभिनयकौशल्य आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर तन्वीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते. यामध्येच आता तिच्या आईची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

तन्वी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा तन्वी तिच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिच्या आईचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच तन्वीच्या आईचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तन्वीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. तन्वी बऱ्यापैकी तिच्या आईसारखी दिसते. त्यामुळे अनेकांनी कमेंट करत तिला आईची कार्बनकॉपी म्हटलं आहे. विशेष म्हणजे तन्वी लोकप्रिय अभिनेत्री असूनही तिची आई अत्यंत साध्या पद्धतीने राहते हे त्यांच्या फोटोवरुन लक्षात येतं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार