Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पाहिल न मी तुला' फेम तन्वी मुंडले या मराठमोळ्या अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 21:05 IST

पाहिल न मी तुला या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले घराघरात लोकप्रिय झाली होती.

पाहिल न मी तुला या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले घराघरात लोकप्रिय झाली होती. तन्वी  या मालिकेतून घराघरात पोहोचली... तिनं या संधीचं त्यांनी सोनं केलं मात्र मालिकेला तितका उत्तम प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मालिकेने लवकर गाशा गुंडाळला... असं असलं तरी तनवी ची भूमिका नक्कीच प्रेक्षकांना भावली...त्यानंतर तन्वी पुन्हा कोणत्या भूमिकेत झळकणार याची उस्तुकता चाहत्यांना होती. त्याचं उत्तर आता मिळालंय...

भाग्य दिले तू मला या मालिकेतून तन्वी लवकरच आपल्या भेटीस येत आहे. प्रोमोमधला तन्वीचा  नवा लूक चाहत्यांना भावलाय...साडीमध्ये ती खूपच गोड दिसतेय..या मालिकेत तन्वीसोबत अभिनेता विवेक सांगळे हा झळकेल...मालिकेतील तन्वीला संस्कृती जपण्याचा ध्यास आहे तर विवेकला नाविन्याची कास आहे. तर अशा या हळुवार प्रेमाची गोड गोष्ट आपल्याला भाग्य दिले तू मला या मालिकेतून उलगडणार आहे.  या नव्या मालिकेच्या शुटिंगला सुरवात झालीये. तन्वीने शुटिंगचे फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये.

चाहत्यांनी तन्वीला तिच्या या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत...  तन्वी मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळची असून बाबा वर्धम् या नाटकाच्या ग्रुपमधून तिनं अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. बीएसस्सी फिजिक्सची पदवीधर, गोड चेहेरा, मातृभाषेवरची उत्तम पकड आणि प्रायोगिक नाट्याची पार्श्वभूमी असणाऱ्या या कोकणकन्येला या भूमिकेनं ओळख मिळवून दिली.

टॅग्स :टिव्ही कलाकार