Join us

एक मालिका केलेले कलाकार सीनियरला पाण्यात पाहतात..; सुरेखा कुडचींकडून 'बिग बॉस' सदस्यांची खरडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:06 IST

सुरेखा कुडचींनी घरात वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्यामुळे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील सदस्यांची खरडपट्टी काढली आहे (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टार आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार सहभागी आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात खडाजंगी झाली. याशिवाय वैभव चव्हाण आणि वर्षाताईंमध्ये वाद दिसून आले. या सर्व प्रकरणावर बिग बॉस मराठी ३ च्या स्पर्धक सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांचा राग व्यक्त केलाय.

सुरेखा कु़डची काय म्हणाल्या?

सुरेखा कुडचींनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीय. ज्यात त्यांनी लिहिलंय की, "बिग बॉस मराठी सीझन ५... खूप आतुरतेने वाट पहाट होते... वर्षाताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला.. पण काही स्पर्धक मराठी असून मराठी लोकांच्या मानसिकतेवर बोलतात तेव्हा वाईट वाटतं... मी स्वतः साऊथची आहे.. माझी भाषा कन्नड आहे पण मला ओळख दिली या महाराष्ट्राने.. आपल्या महाराष्ट्रात कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत ... "

\

 

वर्षाताई महाराष्ट्र तुमच्या पाठीशी

सुरेखा पुढे लिहितात , "असं असताना आज बिग बॉसच्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट असलेली, एक काळ मराठी चित्रपट इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री वर्षाताईंचा जेव्हा अपमान करतात तेव्हा वाईट वाटत... मान्य आहे त्या घरात सगळे सारखे आहेत सगळे स्पर्धक आहेत पण तरीही बोलताना वयाचा भान राखण गरजेचे आहे असं मला वाटतं. ३ महिन्यांचा खेळ संपला की शेवटी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जात.. आणखी एक नवल म्हणजे आत्ता कुठे एक मलिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या सिनियरला पाण्यात पाहतो, त्यांच्यावर हसतो हे पाहिल्यावर लाज वाटते .... असो वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमचा बाजूने उभा आहे."

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुख