Join us

'सेक्सी व्हिडीओ पाठव'; मराठी अभिनेत्रीकडे नेटकऱ्याने केली विचित्र मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:25 IST

Surabhi bhave : '३६ गुणी जोडी' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सुरभी भावेने या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक कलाकार या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यात बऱ्याचदा कलाकारांना कौतुकासोबतच विचित्र प्रसंगानाही सामोरं जावं लागतं. असाच एक विचित्र प्रकार सध्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत घडला आहे. एका नेटकऱ्याने थेट तिच्याकडे सेक्सी व्हिडीओची मागणी केली आहे.

'३६ गुणी जोडी' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी भावे (surbhi bhave) हिला एका नेटकऱ्याने विचित्र प्रश्न विचारला असून या व्यक्तीला सुरभीने त्याच्याच शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. इतकंच नाही तर त्याची रितसर तक्रारही केली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुरभीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका नेटकऱ्याने तिला नाहक त्रास दिल्याचं दिसत आहे. तसंच या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने घडलेला प्रकारही सांगितला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सुरभीने इन्स्टाग्रामवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात एका व्यक्तीने तिला अश्लील मेसेज केला आहे. “सेक्सी व्हिडीओ पाठव. तुला आवडतात का मी पाठवलेले व्हिडीओ,” अशा अश्लील भाषेत एका व्यक्तीने तिला मेसेज केला.यावर सुरभीनेही त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुझ्या आईला असे व्हिडीओ पाठव. त्यांना आवडले तर मी

बघेन. याबाबत मी सायबर पोलिसांना कळवलं आहे”, असा रिप्लाय सुरभीने दिला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने पोस्टही लिहिली आहे.

काय आहे सुरभीची पोस्ट

“ह्यांनी मला अनेकवेळा अश्लील विडिओ पाठवले. पण मी सतत दुर्लक्ष केले. पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले. मग मी रिप्लाय दिला ,जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे…त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता, पण त्यांना झोंबल ते…अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते, तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो?? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक ना** केले जाईल ह्याची नोंद घ्यावी. P.S. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सुरभी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने स्वामिनी, ३६ गुणी जोडी या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच,पावनखिंड,चंद्रमुखी,त्रिभंगा या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन