Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:49 IST

सुरभीच्या लेकीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुरभीची लेक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसताच अभिवादन करताना दिसत आहे.

अनेक मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारून अभिनयचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. 'स्वामिनी' या कलर्स मराठीवरील मालिकेमुळे सुरभी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील ऐतिहासिक भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. नुकतंच सुरभीने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 

सुरभीच्या लेकीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुरभीची लेक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसताच अभिवादन करताना दिसत आहे. अभिनेत्रीने लेकीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. "काही दैवतं अशी असतात की त्यांच्या समोर नतमस्तक होणं हे शिकवावं लागत नाही ,ते आपसूक होत ,माझ्या लेकीने छत्रपती शिवाजी महाराज दिसल्यावर आपणहून तिला त्यांना अभिवादन करावंस वाटलं...प्रचंड अभिमान!!! दिग्पाल लांजेकर महाराज लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून तुमच्या तळमळीचे हे छोटं फळ निश्चित अजून बळ देईल हे नक्की", असं कॅप्शन सुरभीने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या लेकीचं कौतुक केलं आहे. 

स्वामिनी मालिकेनंतर सुरभी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. 'भाग्य दिले तू मला', '३६ गुणी जोडी','राणी मी होणार' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ही अनोखी गाठ' या सिनेमातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. सुरभी सध्या 'अबीर गुलाल' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारछत्रपती शिवाजी महाराज