Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायकाचं 'मार्केट डाऊन'? शो मधून झाली बाहेर, 'ही' मराठमोळी अभिनेत्री घेणार जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 12:54 IST

मलायकाला शो मधून बाहेर करण्यात आलंय, याचं नक्की काय कारण यावर चर्चा सुरू आहे

Malaika Arora India’s Best Dancer : मलायका अरोरा हे बी टाऊनमधील एक चर्चेत असलेले नाव. मलायकाच्या फॅशन सेन्सची आणि हॉटनेसची कायम चर्चा असते. तरूणाईपासून ते अगदी महिला वर्गापर्यंत साऱ्यांनाच तिच्या फिटनेसचे अप्रूप वाटते. तशातच तिच्या डान्सच्या कौशल्यामुळे ती वाहवा मिळवत असते. मात्र सध्या मलायका अरोरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सलग दोन सीझन मलायका अरोरा ज्या डान्स शो मध्ये जज म्हणून काम पाहत होती, त्यात आता ती दिसणार नसल्याची माहिती मिळत आहे. सोनी टीव्हीचा डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' हा तिसरा सीझन घेऊन परतत आहे. पण या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून IBD जज करणारी बॉलीवूड दिवा मलायका अरोरा हा आता या शो मध्ये जज म्हणून दिसणार नाहीये. तिच्या जागी एक प्रतिभावान अभिनेत्री ही भूमिका पार पाडणार आहे.

मलायकाला 'ही' करणार रिप्लेस

आत्तापर्यंत मलायका अरोरा, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हे त्रिकूट IDB चे जज होते. ते तिघे एकत्र मिळून भारतातील सर्वोत्तम डान्सर शोधत बसायचे. तर भारती सिंग आणि हर्ष यांनी या शोचे सूत्रसंचालन करत होते. पण आता मलायका या शोचा भाग असणार नाही. त्या जागी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेबद्दल सांगायचे तर, सोनाली याआधी अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली आहे.

सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच डान्सर्सना जज करणार आहे

सोनाली बेंद्रेचा मात्र हा पहिलाच रिअॅलिटी शो असेल, जिथे ती डान्सर्सना जज करताना दिसणार आहे. या शो शी जोडून घेण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. पण मलायका या शोचा भाग का होणार नाही, याचे कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलची जागा घेणार आहे. हा शो 8 एप्रिलपासून शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा शो कोण होस्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दोन राऊंड्स झाले

इंडियाज बेस्ट डान्सरच्या ऑनलाइन ऑडिशन्स दोन महिन्यांपूर्वी सुरू झाल्या होत्या. देशभरातील डान्सर्सना या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी निर्मात्यांनी ऑनलाइन ऑडिशन्स घेतल्या होत्या. या ऑडिशनमध्ये निवडलेल्या स्पर्धकांची जजेससमोर आणखी एक फेरी झाली.

टॅग्स :मलायका अरोरासोनाली बेंद्रेनृत्यटेलिव्हिजनबॉलिवूड