Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पिल्लई आडनावामुळे ते मला दाक्षिणात्य समजले आणि...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:03 IST

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "आडनावामुळे मला..."

दमदार अभिनयाने कलाविश्वात ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे शर्वणी पिल्लई. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करुन तिने मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'तू तिथे मी', 'अवंतिका', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'ग्रहण' या मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. 'मुलगी झाली हो' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली शर्वणी आता 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

शर्वणीने मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे. पण, पिल्लई आडनाव असल्यामुळे शर्वणी दाक्षिणात्य असल्याचा समज झाला होता. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शर्वणीने हा अनुभव सांगितला. "मी डबिंगसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. ऑडिशन झाल्यावर तो माणूस शांतपणे बसला आणि मला म्हणाला की तुम्ही उत्तम अभिनय केला, लिप्सिंग पण बरोबर होतंय. पण, फक्त एकच प्रॉब्लेम आहे.  तुमचे उच्चार साऊथ इंडियन आहेत. त्यानंतर ते मला खूप काही बोलले. मग त्यांना मी दाक्षिणात्य नसल्याचं सांगितलं. माझ्या पिल्लई आडनावामुळे मी साऊथ इंडियन आहे आणि माझी मल्याळम आहे असं त्यांना वाटलं होतं," असं शर्वणीने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

शर्वणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. फोटो आणि व्हिडिओबरोबरच शर्वणी तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार