Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कपड्यांवरुन तुम्ही मुलींना जज करणार का?", ट्रोल करणाऱ्यावर मराठी अभिनेत्री भडकली, थेट वॉर्निंग देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:45 IST

"आता तुम्ही मग शर्ट पॅन्टमध्ये का दिसता?",कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याला 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीने धरलं धारेवर

Marathi Actress On Trolling: सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.  त्यामुळे इथे प्रत्येकजण हा प्रतिक्रियावादी झाला आहे. प्रतिक्रिया द्यायला हरकत नाही, पण केव्हा बोलायचं यापेक्षाही किती बोलायचं, हे प्रत्येकाला समजेल तेव्हा लोकमाध्यमांवरचं वातावरण अधिक चांगलं होईल. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या खासगी वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यावर चर्चा होते आणि त्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. एखाद्या कलाकारांच्या चांगल्या कामाचं जितकं इथे कौतुक केलं जातं. त्यापेक्षा अधिक आता ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगकडे काही जण दूर्लक्ष करतात तर काहीजण अगदी सडेतोड उत्तर देतात. 

असाच काहीसा प्रकार एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीसोबत घडला आहे. सोशल मीडियावर कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याला या अभिनेत्रीने चांगलंच धारेवर धरलं आहे. या अभिनेत्रीचं नाव मानसी सुरेश. सध्या मानसी सुरेश सावळ्याची जणू सावली मालिकेत काम करताना दिसतेय. अभिनेत्री मानसी सुरेश सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स तसेच फोटो, व्हिडीओज शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच मानसीने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने कपड्यांवरुन तिला ट्रोल केलेल्या एका यूजरचा तिने खडेबोल सुनावले आहेत.काय मुलींनो, कोण ठरवणार आपण कप़डे कसे घालायचे? असा सवाल देखील तिने याद्वारे केला आहे.

दरम्यान, मानसीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोवर नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय," एक काळ होता जेव्हा मावश्या साड्यांमध्ये दिसायच्या आणि लाड करायच्या. खाऊ घालायच्या आणि हा आजचा ट्रेंड...", ही कमेंट पाहून अभिनेत्रीने त्या नेटकऱ्याला सणसणीत उत्तर दिलं आहे. 

अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

मानसी सुरेशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये लिहिलंय," एक काळ होता जेव्हा पुरुष पांढरा सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून फिरायचे. आता तुम्ही शर्ट-पॅन्टमध्ये का दिसता हो? एक काळ होता जेव्हा पुरुष शेतामध्ये राबायचा, आता तुम्ही कंपनीमध्ये जॉब का करताय?  एक काळ होता जेव्हा पुरुष बाईचा खूप आदर करायचा आणि तुमचे विचार बघा.  कपड्यांवरुन तुम्ही मुलींना जज करणार का, कोण आहात तुम्ही आणि राहिला प्रश्न साड्यांचा... आम्हाला साडीमध्येही लढता येतं आणि शॉर्ट्समध्येही. त्यानंतर आता कमेंट डिलिट करायची नाही हा... ", अशी वॉर्निंग देत मानसीने त्या नेटकऱ्याला चांगलंच धारेवर धरलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress slams troll for judging women based on clothing.

Web Summary : Marathi actress Mansi Suresh rebuked a social media user who trolled her clothes. She questioned judging women by attire, asserting women can fight in sarees or shorts.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया