Join us

Video: 'पिरतीच्या झुल्यात झुलवा'; ढोलकीच्या तालावर संजनाच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:44 IST

Rupali bhosale: या प्रोमोमध्ये संजना म्हणजेच रुपाली एका कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्समुळे तिने नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosale). या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारुनही रुपालीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. फार मोजके असे कलाकार आहेत ज्यांच्या खलनायिकाच्या भूमिका तुफान गाजल्या त्या कलाकारांच्या यादीत रुपालीचं नाव घेतलं जातं. रुपाली या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारी रुपाली सध्या तिच्या लावणीमुळे चर्चेत येत आहे. 

अलिकडेच स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजना म्हणजेच रुपाली एका कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्समुळे तिने नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.

दरम्यान, रुपाली 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा' ही लावणी सादर करताना दिसत आहे. यापूर्वीदेखील रुपालीने अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु, तिच्या या व्हिडीओला विशेष पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकारुपाली भोसलेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार