Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आई गेल्यानंतर मी पूर्णपणे ढासळले होते", समृद्धी केळकर भावुक, म्हणाली, "तिने मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:00 IST

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आईबद्दल बोलताना समृद्धी भावुक झाली.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे समृद्धी केळकर. दमदार अभिनयाने अगदी कमी वेळात समृद्धीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी अल्पावधीतच टेलिव्हिजनवरील लाडका चेहरा बनली. समृद्धीची आयपीएस किर्ती जामखेडकर ही भूमिका प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. 

पण, समृद्धीच्या आईने तिला अभिनय करताना पाहिलं नाही. त्याआधीच त्या हे जग सोडून गेल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समृद्धी आईविषयी बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. समृद्धीने राजश्री मराठीच्या नवरात्रोत्सव विशेष भागात हजेरी लावली होती. यावेळी आईबद्दल बोलताना समृद्धी भावुक झाली होती. "आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आहे. आई, बाबा आणि ताई या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. जेव्हा आई गेली तेव्हा मी पूर्णपणे ढासळले होते. काय करायचं हे मला कळत नव्हतं," असं समृद्धी म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "पण, मला माहितीये ती माझ्याबरोबर आहे. ताई आणि बाबांबरोबर तीदेखील आहे. आपली माणसं कुठेही गेली नाही आहेत. हे सांगून मी स्वत:ला स्ट्राँग करत असते. माझी आई, मावशी आणि आजी या माझ्या आयु्ष्यातील तीन देवी आहेत. मी खूप रागीट आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायला शिक, हे आई मला कायम सांगायची. तुला पुढे जायचं असेल, तर रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, हे ती सांगायची."  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार