मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. नुकतंच मराठी कलाविश्वातील एक कपल लग्नाच्या बेडीत अडकलं आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे यांनी सप्तपदी घेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. साक्षी आणि अर्थवचा लग्नसोहळा आणि इतर कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गुरुवारी त्यांचा संगीत सोहळा पार पडला.
साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्याला अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. साक्षीने या संगीत सोहळ्यात खास डान्स परफॉर्मन्स केला. तिने मेरा पिया घर आया या बॉलिवूड गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की साक्षी अथर्वसोबत बसलेली दिसत आहे. त्यानंतर गाणं लागल्यावर ती मध्येच उठून स्टेजवर जाते आणि डान्स करायला लागते. साक्षीने अथर्वला दिलेल्या सरप्राइजने अभिनेतादेखील थक्क झाल्याचं दिसलं.
अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली. तर साक्षी महाजन अलिकडेच 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकली. या मालिकेपूर्वी साक्षीनं 'उदे गं अंबे' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका साकारली होती.
Web Summary : Marathi actress Sakshi Mahajan surprised her husband, Atharva Karve, at their wedding reception with a dance performance to 'Mera Piya Ghar Aaya'. The couple recently tied the knot, with celebrations attended by many artists.
Web Summary : मराठी एक्ट्रेस साक्षी महाजन ने अपनी शादी के रिसेप्शन में 'मेरा पिया घर आया' गाने पर डांस कर पति अथर्व कर्वे को चौंका दिया। इस जोड़े ने हाल ही में शादी की, जिसमें कई कलाकारों ने भाग लिया।